पवना लेक भारतातील महाराष्ट्र राज्यातील प्रसिध्द हिलस्टेशन, थंड हवेचे ठिकाण लोणावळा गावाजवळील एक कृत्रिम सरोवर आहे. मुंबई आणि पुण्याच्या जवळपासच्या सुट्टीच्या ठिकाणांपैकी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.
गाडीने कसे पोहोचाल? how to reach pawna lake
पवना लेकवर आपण खासगी वाहनाने किंवा टॅक्सीने जाऊ शकता.
पुण्याहून
पुण्याच्या मध्यवर्ती भागातून चांदणी चौकात येऊन NH48 एक्स्प्रेस हायवेने रावेत पर्यंत या आणि जुना पुणे - मुंबई हायवे ने कामशेत येथे डावीकडे वळून 17 किमी पवनानगर व 5 किमी अंतरावर ठाकुरसाई (पवना लेक) येथे पोहचाल.
टिपः प्रवास करताना Google Map चालू ठेवावा.
मुंबईहून
मुंबईच्या मध्यवर्ती भागातून येताना ईस्टर्न एक्सप्रेस हायवे घ्या.
घाटकोपर येथे पुणे – एक्सप्रेस हायवेवर (NH48) वळा.
पुण्याच्या दिशेने लोणावळ्याच्या पुढे बौर बोगदा/Baur Tunnel पर्यंत आल्यावर दुसरा बोगदा/Tunnel क्रॉस करून गाडी स्लो करून डाव्या बाजूस NH48 एक्स्प्रेस हायवेवरून बाहेर पडा आणि पवनानगर रोड वर डाव्या बाजूस 10 किमी अंतरावर पवना लेकवर पोहोचाल.
लोकल वाहतूक Public Transport
मुंबईहून
पवना लेकवर जाण्यासाठी थेट एसटी बस सेवा उपलब्ध नाही. पण आपण ट्रेन ने लोणावळा स्टेशन आणि त्यानंतर रिक्षा किंवा टॅक्सीने पवना लेकवर जाऊ शकता. जे की तुम्हाला 1000 रुपये एका बाजूचा खर्च येवू शकतो.
पुण्याहून
पुणे रेल्वे स्टेशन पासुन लोकल ट्रेनने कामशेत रेल्वे स्टेशनला उतरून ऑटोरिक्षा किंवा टॅक्सीने पवना लेक ला पोहचाल. तुम्हाला साधारणतः 800 रुपये खर्च येईल.
अन्य पर्याय
बाइक
पवना लेकवर जाण्यासाठी बाईक ही एक उत्तम पर्याय आहे. मुंबई आणि पुण्याहून अनेक बाईकर्स पवना लेकवर सहलीसाठी जातात.
सायकल
साहसी आणि निरोगी पर्याय म्हणून आपण सायकलने देखील पवना लेकवर जाऊ शकता.
पवना लेक जवळील ठिकाणे
पवना लेक सहलीच्या वेळी आपण लोणावाला, सह्याद्री डोंगर रांग या ठिकाणांना भेट देऊ शकता.
पवना लेक येथे काय करायचे?
पवना लेकच्या किनाऱ्यावर तंबू/टेन्ट लावून कॅम्पिंगचा आनंद घ्या. बोटिंग करा. कायाकिंग करा.
सरोवराच्या भोवती फिरून निसर्गाचा आनंद घ्या.
किल्ले तिकोणा, लोहगड आणि विसापूर यांची सहल करा. पण ट्रेक करताना योग्य ती काळजी घ्यावी, ट्रेकिंग सेफ्टी गिअर घेऊनच.
नोंद
पवना लेकला भेट देताना पर्यावरणाची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
पाण्याच्या ठिकाणी न जाता येथे पाळले जाणारे नियमांचे पालन करा.
पवना धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी सक्त मनाई आहे असे आदेश पोलिस खात्याने दिले आहेत.
अधिक माहितीसाठी
कॉल: 7066664458
वेबसाईट: www.pawnalake.net
Comments